सांगली जिल्ह्यात मध्य रात्री नवीन ८ कोरोनाग्रस्त; नेर्ली येथील कोरोनाबाधिताचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

जिल्ह्यातील जनतेला शुक्रवार हा दिलासादायक गेला असतानाच मध्य रात्री बारा वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. मुंबई आणि परिसरातून आलेल्या तब्बल आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याच बरोबर जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. कडेगाव तालुक्यातील नेर्ली इथल्या ५७ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा आज पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक होती. रुग्णाला नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. जिल्ह्यात सद्य स्थितीत ५१ कोरोनाबाधित रुग्णांवर मिरजेतील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु असून जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या हि आता १०९ वर जाऊन पोहोचली आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पर राज्यासह अन्य जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रवासी दाखल होत आहेत. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरण्याची लक्षणे आढळून असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः मुंबईतून आलेल्या प्रवाशांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्याभरापासून दररोज रुग्णांची संख्या वाढत असताना शुक्रवारी एक ही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र मध्य रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई आणि परिसरतुन आलेल्या तब्बल आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याने जिल्हा हादरून गेला आहे. त्याच बरोबर जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी हि गेल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. जत तालुक्यातील औंढी येथील ५५ वर्षाच्या पुरुषाचा अहवाल पॉझिटिव आला आहे .सदर व्यक्ती १६ मे रोजी मुंबईहून आलेली आहे . खानापूर तालुक्यातील कारंजे येथील ३० वर्षिय पुरुष कोरोणा बाधित झाला असून सदर व्यक्ती १८ मे रोजी मुंबईहून आलेली आहे. नेर्ली येथील कोरोणा पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा २८ वर्षिय मुलगाही कोरोणा बाधित झाला आहे. शिराळा तालुक्यातील रेड येथील पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा निकटवर्तीय २० वर्षीय तरुण नातेवाईक कोरोणा बाधित झाला आहे. शिराळा तालुक्यातील खिरवडे येथील कोरोणा बाधित व्यक्तीची निकटवर्तीय ५२ वर्षीय महिला कोरोना बाधित झाली आहे. तासगाव तालुक्यातील कचरेवाडी येथील २८ वर्षीय पुरुष कोरोना बाधित झाला आहे. कडेगाव तालुक्यातील आंबेगाव येथील कोरोना बाधित झालेल्या रुग्णाची बारा वर्षीय मुलगी तसेच नऊ वर्षीय मुलगा ही कोरोना बाधित झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.

तसेच कडेगाव तालुक्यातील नेर्ली येथील 57 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित होता. मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. या रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती. रुग्णाला नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तसेच त्यांना मधुमेह होता. सदर व्यक्ती १८ मे रोजी मुंबईहून आलेली होती. या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आज आखेर मृत्यू झालेल्यांची संख्या चार झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

Sangli

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment