सातारा जिल्ह्यात 48 नवीन कोरोनाग्रस्त; कराडातील सोमवार पेठ, वाठार मध्ये कोरोनाचा शिरकाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 43, प्रवास करुन आलेले 5, असे एकूण 48 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असून यामध्ये 1 ते 75 वर्षे वयोगटातील 25 पुरुष व 23 महिलांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये माण तालुक्यातील खडकी येथील 44 वर्षीय पुरुष, इंजबाब येथील 28 वर्षीय पुरुष, पळशी येथील 33 वर्षीय पुरुष, मोगराळे 34 वर्षीय पुरुष, दानवलेवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, वावरहिरे येथील 35 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 21 वर्षीय पुरुष, 22 व 25 वर्षीय महिला, लोणंद येथील 31 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील सुरली येथील 56 वर्षीय पुरुष, साप येथील 41 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील 25,36,47 वर्षीय पुरुष व 50,40,23 वर्षीय महिला, काळकूटवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, जावळी तालुक्यातील बिरामणेवाडी येथील 16 व 45 वर्षीय महिला, सायगाव येथील 60 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील जिहे येथील 20 वर्षीय युवक, शाहूनगर येथील 38 वर्षीय महिला, राधिका रोड येथील 50 वर्षीय्‍ पुरुष, खावली येथील 60 वर्षीय महिला, सदर बझार, कपिला पार्क येथील 40 वर्षीय महिला,मोळाचा ओढा येथील 25 वर्षीय पुरुष, बोरगाव येथील 13 वर्षीय युवती, 25 वर्षीय महिला व 1 वर्षाची बालिका, लिंब येथील 39 वर्षीय महिला. चोरगेवाडी येथील 30,16,48,36,24,20,40 वर्षीय पुरुष व 23, 45,75,35 वर्षीय महिला.
वाई तालुक्यातील अभेपूरी येथील 45 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील वाठार येथील 19 वर्षीय युवती, कैलास अर्पाटमेंट सैदापूर येथील 30 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ कराड येथील 46 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 48 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंत १ हजार ३०४ कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर एकूण १४ हजार ७१६ जणांचे नमुने आत्तापर्यंत चाचणीसाठी घेण्यात आलेले आहेत. आजवर एकूण ७८४ जण कोरोनमुक्त झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण ५५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून ४६५ जणांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment