ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे सामान्य शेतकऱ्यांस पत्र…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संपर्काचे अनेक किस्से सांगितले जातात. आपल्याशी संपर्क करणाऱ्या प्रत्येक माणसांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न ते करतात. असाच अनुभव आलाय कराड तालुक्यातील येणके येथील चंद्रकांत गरूड या सामान्य शेतकऱ्याला.

चंद्रकांत गरूड यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील ८० वर्षाच्या वयात शरद पवार यांचा झंजावती प्रचार पाहून त्यांना एक पत्र लिहिलं. त्यामध्ये पवारसाहेबांनी राज्यभर केलेला झंझावाती प्रचार व त्यांच्या लढाऊ बाण्याचे कौतुक केले होते. काही दिवसातच गरुड यांच्या पत्राला शरद पवार यांनी उत्तरादाखल पत्र पाठवताच त्यांना आश्चर्याचा आनंदी धक्का पोहोचला. सत्तास्थापनेच्या तणावपुर्ण वातावरण असताना अत्यंत व्यस्त दिनक्रमातुन पवारसाहेबांनीही स्वतःची स्वाक्षरी करत गरूड यांना दिवाळीच्या शुभेच्छा यापत्रात दिल्या होत्या.

हे पत्र हातात पडल्यानंतर गरूड यांचा विश्र्वास बसला नाही परंतु हे पत्र खरे होते. पत्र पाहून गरुड यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.एवढा मोठा नेता सामान्य माणसाच्या पत्राची दखल घेऊन मोठया राजकिय धामधुमीत दिपावलीच्या शुभेच्छा देतो याचे अप्रुप गरुड यांचेसह गावकऱ्यांना वाटत आहे.

शरद पवारांचे पत्र माझेसाठी अनमोल ठेवा असुन तो मी जपणार असुन यातुन प्रेरणा घेऊन समाजासाठी काहीतरी करत राहणार असा विश्वास रामचंद्र गरुड यांनी व्यक्त केला आहे. राजकिय निर्णय घेताना टोकाचे कठोर असणारे शरद पवार शेती व शेतकरी यांचेबाबत कमालीचे हळवे होणारे, शरद पवार म्हणजे न उलघडणारे कोडे आहे अशीच काहीशी भावना गावकऱ्यांनी यापत्रावर व्यक्त केल्या.

Untitled design (19)