‘शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण’; युवक काँग्रेस चा निर्धार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | शेतकऱ्यांवर अन्याय करणारी ३ कृषी विधेयके राज्यसभेत मोदी सरकारनेहुकूमशाही पद्धतीने रेटून नेली ,याचा तीव्र निषेध महाराष्ट्र युवक काँग्रेसने  केला आहे.  ‘कृषीसंस्कृती कार्पोरेट  मित्रांच्या  दावणीस बांधू नका’ असा इशारा देत ‘  शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण’,असा निर्धार आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी  पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केला आहे .

कृषी विधेयके मांडताना मोदी सरकारने संसदीय पद्धतीला फाटा दिला. मतदानाची विनंती फेटाळली .या विधेयकावर देशाच्या कोट्यवधी शेतकऱ्यांचे आक्षेप आहेत. शेतकऱ्यांच्या कल्याणाचे नाव घेऊन भलत्याच मंडळींचे कल्याण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेतू आहे . कृषी उत्पन्न समितीचे भय दाखवून कंपन्यांच्या तोंडी शेतकऱ्याला दिले जात आहे ,असा आरोप या पत्रकात करण्यात आला आहे.

हमी भाव कायद्यामुळे शेतकऱ्याला सुरक्षा होती. या ३ कृषी विधेयकांमध्ये हमी भावाबद्दल अवाक्षर का नाही ,हा प्रश्न आहे. त्यावर मोदींनी ट्विट करून काय उपयोग आहे ? विधेयके मांडण्यापूर्वी राज्य सरकारच्या सूचना,अर्थतज्ञ् ,अभ्यासक ,शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या नाहीत. मोदी सरकारने नोटबंदीपासून,जीएसटी  सर्व निर्णय असेच घाई गर्दीत घेतले ज्याचे दुष्परिणाम झाले  आहेत. कृषी विधेयकांचेही दुष्परिणाम होणार आहेत . या कंपन्या फसविणार नाहीत हे कशावरून ? असा प्रश्नही हनुमंत पवार यांनी विचारला आहे.

ही विधेयके  शेतकरी विरोधी ,छोट्या व्यापाऱ्यांच्या विरोधात  आहेत. अन्न सुरक्षा कायद्याला नख लागणार आहे . शेतकऱ्यांचा आवाज उठविणाऱ्या खासदारांचे निलंबन रद्द करा . सरकारच्या हुकूमशाहीचे निषेध करतो,असेही हनुमंत पवार यांनी या पत्रकात म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment