शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतली शरद पवार यांची भेट 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जावलीचे भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी यावेळी सातारा जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत पवार यांच्यासोबत चर्चा केली. तसेच काही निर्णय घेण्याबाबतही सूचना केल्या. दरम्यान, सातारा एमआयडीसी संदर्भात महत्वाचे काही निर्णय घेण्याची सूचना त्यांनी केली ज्यामध्ये बजाज कंपनीची ४० एकर जमीन पडून असून ती इतर कोणत्याही उद्योगाला हॅन्डओव्हर करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत असल्यामुळे ही स्थिती पाहता जिल्ह्यात कोरोना चाचणीसाठी लॅब व्हावी अशी मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या राज्यातील शेतकरी पीककर्ज हा विषय चर्चेचा ठरत आहे. याबाबतही भोसले यांनी पवारांकडे सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्याचे सांगितले. आणि ही परिस्थिती जावली तालुक्यात अधिक आहे असेही या चर्चेच्या वेळी त्यांनी सांगितले.

शिवेंद्रसिंहराजे भोसले हे उदयनसिंहराजे भोसले यांचे भाऊ आहेत. उदयनसिंह भोसले यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपामध्ये प्रवेश घेतला होता. या बैठकीत राजकीय कोणतीही चर्चा झाली नसल्याचे समोर आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment