शिर्डी-बितनगडावर सापडली शिवकालीन तोफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | अकोले तालुक्यातील बिताका गावाजवळच्या बितनगडावर पूरातन काळातील शिवकालीन तोफ सापडली आहे. पाण्याच्या टाकीतील गाळ काढण्याचे काम सुरु असताना तरुणांना ही तोफ सापडल्याचे समजत आहे.

पाण्याच्या टाक्यामधील गाळ काढण्याचे खोदाई काम सुरु असताना पुरातन तोफेच्या आकाराची लोखंंडी वस्तु तरुणांना आढळून आली. सदर बाब तरुणांनी ग्रामस्थांना सांगितल्यानंतर पुरात्व विभागाला यांची माहिती देण्यात आली. स्थानिकांनी सदर तोफ शिवकालिन असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

सदर तोफेचे वजन ५० किलो पेक्षा अधिक आहे. घटनास्थळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले असून हि तोफ छञपती शिवाजी महाराजांच्या काळातील असल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. हि तोफ शिवकालीन असल्याने स्थानिक तरूणांनी आनंद व्यक्त केला. वार्ता तालुक्यात सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्वञ पसरली असल्याने तोफ पहाण्यासाठी नागरिक गर्दी करत आहे.

Leave a Comment