श्रीनिवास पाटलांच्या दिलखुलास जगण्याचं रहस्य..त्यांच्याच लेखणीतून..!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । श्रीनिवास पाटील. सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि साताऱ्याचे विद्यमान खासदार. यांच्या मिशा जितक्या भारदस्त आहेत त्यापेक्षा भारदस्त आहे त्यांचं एकूण राहणीमान आणि राजकीय जीवनातील वावर. ज्या वयात नातवंडांना करियर करताना पहायचं, त्या वयात हा माणूस जिल्ह्याची धुरा समर्थपणे पेलतोय. हे सगळं हा माणूस साध्य करु शकतोय ते अंतप्रेरणेच्या जोरावर आणि मिळालेल्या चांगल्या साथीदारांच्या पाठिंब्यावर. आज हे खास नमूद करण्याचं कारण म्हणजे श्रीनिवास पाटील यांनी स्वतः लिहिलेली फेसबुक पोस्ट. आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरुन श्रीनिवास पाटील यांनी आपल्या सामाजिक जीवनातील ५० वर्षांच्या सातत्याविषयी खुलासा दिला आहे. लोकनेता बनणं हे सहज शक्य होत नाही हीच धारणा पाटील साहेबांनी लिहिलेला मजकूर वाचून मनात आल्याशिवाय राहत नाही.

श्रीनिवास पाटील यांनी लिहिलेला मजकूर –

दिवसभरातील कार्यक्रम संपले की रात्री उशीरापर्यंत आलेल्या पत्रांचे, निवेदनाचे आणि कागदपत्रांचे वाचन होते. त्यातून अनेक नवे विषय समजतात. तसेच दुसऱ्या दिवसाच्या कामांची छान आखणी करता येते. महत्वाचं म्हणजे आजुबाजूला काय सुरु आहे हे जाणून घेण्याचं हे वस्तुनिष्ठ माध्यम आजही तेवढचं उपयोगी पडते. हे इतरांना काम वाटू शकतं पण माझ्यासाठी कामात बदल हा खरा विरंगुळा आहे. गेली पन्नास वर्षांची ही सवय आहे. यात खंड पडलेला नाही. अर्थात मतदाराने टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरण्यासाठी प्रत्येक क्षणाचं नियोजन आवश्यक आहे. यासाठीच माझा हा सुमारे अर्ध्या शतकाचा परिपाठ मला महत्वाचा वाटतो आणि तो चुकतही नाही.

परिपाठ हा शब्द आठवला की शाळा आठवतेच. शाळेतील शिस्त ही विद्यार्थी शिक्षा म्हणून पाहत नाही तर स्वतःच्या जडणघडणीचं साधन म्हणूनच पाहत असतो.

सोशल मीडियाच्या जमान्यात नवीन गोष्टी समजण्यासाठी कितीही साधनं उपलब्ध झाली तरी लोकांशी असलेली नाळ न तुटू देता कायम कृतिशील राहण्याचं श्रीनिवास पाटलांचं माध्यम प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीने अनुभवायला हरकत नाही.

https://www.facebook.com/353804234638468/posts/3035165879835610/

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

केंद्र सरकारने केली जम्मू-काश्मीरसाठी ८० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा

दोषींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर ७ दिवसांच्या आत फाशी द्या! केंद्राची सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती

नसरुद्दिन शहांनी ‘जोकर’ म्हटल्यावर अनुपम खेर संतापले; व्हिडिओद्वारे दिलं सडेतोड उत्तर

थेट नगराध्यक्ष निवडीला महाविकास आघाडीचा ब्रेक; सरपंच, नगराध्यक्ष सदस्यांतून निवडणार

Leave a Comment