ठाकरे सरकार घरामध्ये बसले, कोणतेच निर्णय घेतले नाहीत – शेखर चरेगावकर 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी |

भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने आज महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी मेरा अंगण, मेरा रणांगण या आंदोलन करण्यात आले. सर्व भाजपा नेते तसेच कार्यकर्ते यांनी आपल्या घरूनच सकाळी ११ ते १२ या वेळेत आंदोलनात सहभागी झाले होते. सर्वानी आपल्या घरातून सरकार विरोधी घोषणा देऊन आपला निषेध व्यक्त केला. कोरोनाच्या संक्रमणकाळात महाराष्ट्र सरकार काहीच काम करत नाही. मुख्यमंत्री ठाकरे घरात बसले आहेत आणि कोणतेच निर्णय घेत नाहीत असा आरोप भाजपा चे प्रवक्ते आणि सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केला आहे.

महाराष्ट्र सरकार हे कोरोना काळात उपाययोजना राबविण्यात तसेच या संकटाचा सामना करण्यास अपयशी ठरले असून ते निष्क्रिय असल्याचे शेखर चरेगावकर यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले “अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील भौगोलिक स्थिती, लोकसंख्या आणि आरोग्य सुविधा पाहता महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक झाली आहे. मुख्यमंत्री कोणताच ठोस निर्णय घेत नाहीत. लोकांना करमणुकीचे कार्यक्रम दिल्यासारखे सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर कोरोनावर केवळ भाष्य करीत आहेत. राज्यातील बाधितांसाठी काहीच करण्यात आले नाही. तसेच इतर राज्यातील कामगारांसाठीही कोणत्याच सोयी करण्यात आल्या नाहीत परिणामी भविष्यात उद्योग व्यवसाय सुरु झाल्यावर मोठे संकट येणार आहे.”

ठाकरे सरकारची निष्क्रियता सर्वत्र दिसून येत आहे. कोरोनाव्यतिरिक्त आजारी असणाऱ्या रुग्णांसाठी गैरसोय झाली आहे. केवळ घरपोच जीवनावश्यक वस्तू पोहोचवल्या जातील अशा केवळ घोषणा केल्या मात्र अंमलात आणल्या नाहीत. पण दारू घरपोच पोहोचवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकारची सांस्कृतिक राज्य या ओळखीला ठाकरे सरकारने कलंक लावला असल्याचे त्यांनी सांगितले. याआधी इतर राज्ये महाराष्ट्राचे उदाहरण घेत असत पण या संकटकाळात महाराष्ट्राची अवस्था या सरकारने बिकट केली आहे. म्हणूनच आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करत आहोत. असे भाष्य चरेगावकर यांनी केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment