पुण्यातील मार्केट यार्ड सुरु करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिला ‘हा’ महत्वाचा आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । पुणे मार्केट यार्डमधील भुसार बाजार हा संचारबंदी जाहीर झाल्यानंतरही सुरु होता. मात्र येथील काही व्यापाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने बाजार प्रशासनाने काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे बाजार बंद ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बैठक घेऊन तातडीने बाजार सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. बाजार प्रशासकांनी यावर विचार करून निर्णय घेऊन सोमवार पासून बाजार सुरु करू असे सांगितले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना २५ मेला बाजार सुरु करा असा आदेश दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत बाजार बंद राहता कामा नयेत अशा सूचना गेल्या आठवड्यात दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समितीचे प्रशासक आणि व्यापारी यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी तातडीने बाजार पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले. बाजार समितीच्या प्रशासकांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बाजार बंद ठेवला असून आणखी दोन दिवस बाजार बंद ठेवण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. शनिवारी बैठक घेऊन सोमवारपासून बाजार सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली.

दरम्यान भुसार बाजारातील काही व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यूही झाला आहे. यामुळेच घाबरून येथील प्रशासनाने बाजार बंद ठेवला होता. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांकडून थेट आदेश आल्याने त्यांना सोमवारपासून बाजार पुन्हा सुरु करावा लागणार आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून भुसार बाजार सुरु होणार आहे. कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी सामाजिक अलगाव चे सर्व नियम पाळून बाजार उघडला जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment