अकोला-पातूर मार्गावर बोलेरो पिकपची दुचाकीला धडक; एक जागीच जण ठार

अकोला प्रतिनिधी । अकोला-पातुर रोडवरील लाखनवाडा येथे पातुरकडून अकोल्याकडे जाणारी बोलेरो पिकपला भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकीला पिकअप धडकल्यानं या अपघातात एक जण ठार झाला आहे.

पातुरकडून अकोलाकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकप क्रमांक MH30 BD 0439 भरधाव वेगात दुसर्‍या गाडीला ओहरटॅक करतांना समोरून येणाऱ्या प्रभू हिरासीया वय 50 राहणार अकोला यांच्या टु व्हिलर गाडी क्रमांक MH30G5176 ला जब्बर धडक दिल्याने त्यांचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला. हिरासीया यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर पिकप गाडी समोर जाऊन रोडच्या कडेला असलेल्या बैलगाडीला धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच बार्शी टाकळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com