स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला म्हणून चोरटयांनी CCTV कॅमेरे केले लंपास

अमरावती प्रतिनीची । आशिष गवई
अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील बस स्टँडसमोर असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सोमवारी रात्री फोडण्याचा प्रयन्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, चोरटे एटीएम फोडण्यास अयशस्वी झाले असले तरी त्यांनी CCTV कॅमेरे चोरत घटनास्थळावरून पोबारा केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि काही चोरटयांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएमच्या आधी दोन्ही बाजू कापल्या.परंतु चोरट्यांना यातील रक्कम नेता आली की नाही. तेव्हा चोरटयांनी CCTV कॅमेरे चोरण्यावरच समाधान मानत पोबारा केला. सादर चोरट्यांविषयी कोणतीही माहिती मिळाली नाही आहे. दरम्यान मुख्य राज्य महामार्गावरील बस स्टॉपवर असलेले हे एटीएम गॅस कटरने कापत असतांना त्यावेळी कुणाचीच कशी नजर कशी पडली नाही. यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

विशेष म्हणजे एटीएमच्या काहीच अंतरावर पोलीस स्टेशन आहे.तेव्हा रात्रभर वर्दळ असणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेले एटीएम चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केलाच कसा असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. सोबतच या घटनेमुळं पोलिसांच्या सतर्कतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com