विदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादीचे ‘असे’ जागावाटप

नागपूर प्रतिनिधी |  आगामी लोकसभा निवडणुकीच्या विदर्भातील जागावाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील चर्चा पूर्ण झाली आहे. विदर्भातील दहा लोकसभेच्या जागांपैकी सात जागा काँग्रेस लढवणार, तर तीन जागा राष्ट्रवादी लढवणार आहे, यावर दोन्ही पक्षांची चर्चा पूर्ण झाली आहे.

विदर्भात काँग्रेसच्या वाट्याला लोकसभा मतदार संघातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, रामटेक, गडचिरोली-चिमूर, अकोला, यवतमाळ-वाशिम या सात जागा आल्या आहेत.तर विदर्भात राष्ट्रवादी भंडारा – गोंदिया, बुलडाणा, अमरावती या तीन जागांवरून लढणार आहे. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वर्धा लोकसभा मतदारसंघावर आपला दावा केला असल्याने काँग्रेसपुढे पेच निर्माण झाला आहे.

विदर्भ हा नेहमीच काँग्रेसकडे राहिला आहे, पण गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेच्या युतीनं विदर्भ काँग्रेस कडून गेला होता. आता आगामी लोसकभा निवडणुकीत विदर्भ परत मिळवण्यासाठी काँग्रेसनं जोरदार तयारी केली आहे. याची तयारी राहुल गांधी यांनी वर्ध्यात जाहीर सभा घेऊन केली आहे.

 

इतर महत्वाचे –

भारतीय वायुदलाचे मिग २१ विमान ‘येथे’ कोसळले

महिला दिनानिमित्त गुगलची मानवंदना… जगभरात महिला दिन उत्साहात साजरा…

सांगलीत बिबट्याच्या बछड्याचे दर्शन ; नागरिकांत भीतीचे वातावरण

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com