बुलडाणा जिल्ह्यात मतदान गोपनीयतेचा भंग; मतदान करतानाचे व्हिडीओ व्हायरल

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

बुलडाणा प्रतिनिधी । जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात निवडणूक पार पडली. परंतु या निवडणुकी दरम्यान मतदान प्रकियेच्या गोपनीयतेचा भंग झाला असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मतदान प्रक्रियेनंतर काही मतदानकर्त्यांनी मतदान करतानाचे व्हिडिओ व्हायरल केले आहेत. या व्हायरल व्हिडीओमुळे जिल्ह्यामध्ये प्रचंड खळबळ उडाली असून याकडे निवडणूक विभागाचं किती दुर्लक्ष आहे हे यावरून दिसून येत आहे.

या व्हिडिओत बुलडाणा व चिखली विधानसभेतील उमेदवारांना मतदान करताना दिसत आहे. निवडणूक आयोगाचे मोबाइल बंदीचे स्पष्ट निर्देश असताना सुद्धा मोबाइल मतदान केंद्रात नेन्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मतदान करतानाचे चित्रीकरण करून ते व्हिडिओ जाणीवपूर्वक वायरल केल्या करण्यात आले. तसेच या व्हिडिओ मधून हे ही स्पष्ट होतं आहे की अशा एक नव्हे तर अनेकांनी या गोपनीयतेचा भंग केला आहे.

दरम्यान या प्रकारानंतर नायब तहसीलदार भाया भीमसिंग पावरा यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर हर्षल नावाच्या व्यक्ती विरुद्ध मतदान प्रक्रियेच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीने हे चित्रीकरण करून आपल्या व्हाट्सअँपला स्टेटस ठेवले होते. त्याच्या आधारावर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com