सिरकोंडा येथील मतदान केंद्र कायम ठेवा; ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

गडचिरोली प्रतिनिधी। सिरोंचा तालुक्यातील सिरकोंडा येथील मतदान केंद्र रोमपली येथे न हलविता सिरकोंडा येथेच कायम ठेवण्याची मागणी सिरकोंडा येथील गावकऱ्यांनी केली आहे. याविषयीचे निवेदन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात , मागील लोकसभा निवडणुकीत सिरकोंडा येथील मतदान केंद्र मतदानाच्या ऐनवेळी सिरकोंडा पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या रोमपली येथे हलविल्याने मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागला. सिरकोंडा येथील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदानाला वेळेवर पोहचू न शकल्याने मतदानाची टक्केवारी कमी झाली. मतदान केंद्र ऐनवेळी हलविल्याने सिरकोंडा येथील जवळपास ६४२ मतदार मतदानापासून वंचित राहिले.

बुधवारी सिरोंचा येथील तहसीलदार कार्यालयात आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, आविस सल्लागार रवी सल्लम, उपसरपंच लक्ष्मण गावडे, माजी सरपंच इरफा मडे सह गावकऱ्यांनी नायब तहसीलदार एच.एस.सय्यद यांची भेट घेऊन वरील समस्यांविषयी चर्चा करून चर्चेअंती तहसीलदारां मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवून सिरकोंडा येथील मतदान केंद्र कायम ठेवण्याची मागणी केली.

इतर काही बातम्या- 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com