‘छत्रपती शिवाजी महाराज’ असाच उल्लेख हवा; छत्रपती संभाजींची मागणी

कोल्हापुर प्रतिनिधी। कोल्हापुरातील ‘शिवाजी विद्यापीठासाहित’ महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नामकरण हे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे करावे अशी मागणी भाजपा खासदार छत्रपती संभाजी महाराजांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ट्विटरद्वारे केली आहे. तसेच  मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत असंही त्यांनी सांगितलं आहे.

संभाजी महाराजांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं असून, त्यात म्हटलंय की, महाराष्ट्रातील जनमानसात छत्रपती शिवाजी महाराजांचे किती मोठे स्थान आहे हे आपणांस माहितच आहे. काही दिवसांपासून महाराजांच्या नाम उच्चारावरुन मोठी चर्चा होत आहे. मग ते अमिताभ बच्चन प्रकरण असो वा केंद्रीय रवीशंकर प्रसाद यांच, त्या दोन्ही वेळी जाब विचारला जात होता. मात्र यावर कायमस्वरुपी उपाय योजना करणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितले.

त्यामुळे ज्या स्थळाचे नाव केवळ शिवाजी असे आहे. त्या सर्व सार्वजनिक स्थळांचे नामविस्तार करणे आवश्यक आहे अशी मागणी संभाजी महाराजांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्याचसोबत मराठा आरक्षणाकरिता जनता रस्त्यावर उतरुन लढली. त्यात अनेक ठिकाणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अनेक आंदोलकांवर विनाकारण गुन्हे नोंदवले गेले आहेत. याबाबतचे गुन्हे देखील मागे घ्यावेत. अशी मागणी त्यांनी केली आहे. .

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com