कार्यकर्त्यासारखा झटणारा फक्त एकच ‘सत्यजित’ – धैर्यशील माने

कोल्हापूर प्रतिनिधी । ‘दिवसातले २४ तास घरचा तसेच कोणताही विचार न करता उपलब्ध असणारा तसेच २८८ पैकी एवढा झटणारा आमदार जर कोण असेल तर तो सत्यजित पाटील आहे’ असे वक्तव्य हातकणंगले आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी केले आहे.

शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सरूड, तालुका-शाहूवाडी येथे विद्यमान आमदार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विद्यमान शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील, शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आणि अन्य मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी देखील मनोगत व्यक्त केले.’शिवसेनेचे विद्यमान आमदार सत्यजित पाटील यांच्या नावातच सत्यजित आहे. म्हणेजच त्यांच्या नावातच जीत असून त्यांचे विरोधक जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे हे यावेळी ‘कोरे’च राहणार. विरोधक कितीही पैसे वाटू दे. ते पैसे वाले आहेत. पण सत्यजित पाटील यांनी जनतेचे प्रेम मिळवले आहे. तमाम शिवसैनिक आणि जनता जी हजारोच्या संख्येने इथे उपस्थित आहे. तेच त्यांचं वैभव व ऐश्वर्य आहे.” असे उद्गार त्यांनी काढले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com