‘एक सातारकर म्हणुन उदयनराजेंना बिनडोक म्हटलेलं कदापि सहन करणार नाही’- शंभुराज देसाई

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यां  छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी राजे भोसले यांच्यावर टीका केली. उदयनराजे आणि संभाजी राजे यांचा नामोल्लेख टाळत ”एक राजा तर बिनडोक तर दुसऱ्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर”, असं आंबेडकर म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. प्रकाश आंबडेकर यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

”छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले यांच्या बद्दल प्रकाश आंबेडकर यांनी केलेले वक्तव्य निंदनीय आहे. संपूर्ण राज्यात छत्रपतींच्या गादीला मानणारे लोक आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील जनता छत्रपतींच्या घराण्याला त्यांच्या गादीला वंदन करत आली आहे. त्यामुळं सातारच्या गादीचा अवमान खपवला जाणार नाही. त्याच्यावरील टीका कदापि सहन केली जाणार नाही”, असं शंभूराज देसाई यांनी सांगितले.

”दोन्हीही छत्रपतींनी, सातारा आणि कोल्हापूरच्या गादीच्या प्रतिनिधींनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. असं असताना प्रकाश आंबेडकरांसारख्या मोठ्या माणसाने छत्रपतींच्या वंशजांवर टीका करणं गैर आहे चुकीचं आहे. आम्ही सातारकर म्हणून आणि छत्रपतींना मानणारे मावळे म्हणुन छत्रपतींच्या वंशजांवर केलेली टीका कदापि सहन करणार नसल्याचे” देसाई यांनी ठणकावून सांगितले.

नेमकं काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?
“दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे, कुठे वाचनात आलं नाही. एक राजा तर बिनडोक असल्याचे मी म्हणेन, तर दुसरे संभाजी राजे यांनी आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर अधिकभर देत असल्याचं मला दिसतंय. ज्या माणसाला राज्य घटना माहिती नाही. ‘आम्हाला आरक्षण मिळाले नाही, तर सर्वांचे आरक्षण रद्द करा’, अशी ते भूमिका मांडतात. त्यावरून भाजपानं राज्यसभेवर कसे पाठवले? हाच प्रश्न उपस्थित होतो,” असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला. “मी कोणालाही अंगावर घेण्यास घाबरत नाही,” असंही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com