दोन लाखांवरील कर्ज असणाऱ्यांचाही सवलतीसाठी विचार करू- बाळासाहेब पाटील

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
नवनिर्वाचित सहकार मंत्री आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे कराड शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड उत्तर मतदारसंघाला ३० वर्षानंतर मंत्रीपद मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

बाळासाहेब पाटील यांची कराड शहरातून मिरवणूक काढण्यात आली. मंगळवार पेठेत त्यांची पेढेतुलाही करण्यात आली. बाळासाहेब पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. मला मिळालेल मंत्रीपद सामान्यांच्या सेवेसाठी उपयोगात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कर्जमाफी करतांना दोन लाखांवरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचाही सवलतीसाठी विचार करू असं सांगत यशवंतराव चव्हाणांच्या विचारांनी काम करणार अशी आश्वासन बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com