पवार साहेबांच्या संदर्भात चंद्रकांतदादा जे बोलतात ते योग्यच – रोहित पवार 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच कोकण दौरा केला आहे. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर काही आरोप केले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे गुणगान केले होते. “सरकारला सध्या पवार साहेब मार्गदर्शन करतात, असं दिसत नाही. पवारांच्या कामाचा वेग भयंकर असून सर्व देशाने पाहिलं आहे. आम्ही त्यांचा आदर ठेऊनच टीका करतो. या वयात कोकणात जाऊन त्यांनी दोन दिवस मुक्काम केला. या वयातही ते तब्येतीची काळजी न करता समस्येला झडप मारतात”, अशा शब्दांत चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांचे कौतुक केले होते. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना उत्तर दिले आहे. तसेच पवार साहेबांच्या प्रशासकीय तत्परतेसंदर्भात जे तुम्ही बोलता ते योग्यच आहे असे म्हंटले आहे.

पवार यांनी, ‘मा. पवार साहेबांच्या प्रशासकीय तत्परतेसंदर्भात तुम्ही जे बोलता ते योग्यच आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा राज्याला व देशाला नेहमीच झालाय. पण तुम्ही भाजपाच्या चष्म्यातून महाविकास आघाडी सरकारचे काम बघत असल्याने, कदाचित तुम्हाला ‘ज्येष्ठां’चे मार्गदर्शन दिसणार नाही. आर्थिक संकट असतानाही काम जास्त व जाहिरातबाजी कमी या धोरणानुसार महाविकास आघाडी सरकार लोकांच्या हितासाठी झटतंय, पण केवळ जाहिरातबाजी करणाऱ्या भाजपातील लोकांच्या हे कदाचित लक्षात येणार नाही. आज राजकारणापेक्षा आपल्यापुढील आव्हान मोठं आहे, हे आपण आतातरी मान्य कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.’ असे ट्विट करीत चंद्रकांत पाटलांच्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले आहे.

 

दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर चांगलीच टीका केली होती. आणि कोकणसाठी भाजपा सर्वतोपरी मदत करणार असल्याचे म्हंटले होते. रोहित पवार आपल्या ट्विटर अकॉउंटवरून नेहमी कार्यरत असतात. तसेच विविध उपाययोजनांसाठी सरकारला सूचना देखील करीत असतात. कोरोना संकटकाळात त्यांनी सातत्याने जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद ठेवला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment