WhatsApp ने आणखी एक खास फिचर केले लॉंच, जाणून घ्या त्याबद्दल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । WhatsApp युजर्ससाठी एक गुड न्यूज आहे. WABetaInfo च्या एका रिपोर्टनुसार कंपनी पुन्हा एकदा चॅट अटॅचमेंट मध्ये कॅमेरा आयकॉन उपलब्ध करीत आहे. कंपनीने नुकतेच व्हर्जन नंबर 2.20.198.9 मधून एक नवीन गुगल बीटा प्रोग्राम सबमिट केले आहे. यात अॅपच्या अटॅचमेंटमध्ये लोकेशन आयकॉन सुद्धा नवीन डिझाईनला पाहिले जावू शकते.

रुम्सवरून रिप्लेस झाले होते कॅमेरा आयकॉन
परत आलेल्या कॅमेरा आयकॉनला काही दिवसांआधी कंपनीने रूम्स मध्ये शॉर्टकट सोबत रिप्लेस केले होते. रूम्स कंपनीचा व्हिडिओ कॉन्प्रेसिंग प्लेटफॉर्म आहे. ज्याला नुकतेच लाँच करण्यात आले होते. आता WABetaInfo च्या लेटेस्ट रिपोर्ट मध्ये दावा करण्यात येत आहे की, हे आयकॉन बीटा व्हर्जन मध्ये पुन्हा एकदा लाइव करण्यात आले आहे. कॅमेरा शॉर्टकट परत आल्याने त्या युजर्संना मोठा फायदा मिळणार आहे. ज्या अॅपच्या मध्ये फोटो क्लिक करून कॉन्टॅक्ट्सला सेंड करण्याची सवय आहे.

सर्व बीटा युजर्सपर्यंत पोहोचेल अपडेट
अँड्रॉयड अॅपसाठी आलेल्या या अपडेटला सर्व बीटा युजर्स पाहू न शकतील. परंतु, हे जवळपास निश्चित आहे की, काही दिवसात कंपनी सर्व बीटा युजर्संपर्यंत हे अपडेट पोहोचले जाईल. बीटा टेस्टिंग नंतर कंपनी या फीचरच्या स्टेबल अपडेट ला सुद्धा युजर्ससाठी रोलआउट करणार आहे.

या महिन्यात आले होते अडवॉन्स सर्च मोड फीचर
या महिन्याच्या सुरुवातीला अँड्रॉयड बीटा अॅप साठी अडवान्स सर्च मोड ऑप्शन दिले होते. हे अपडेटचे व्हर्जन नंबर 2.20.197.7 होते. या फीचरच्या मदतीने युजर्स चॅटमध्ये फोटो, व्हिडिओ आणि ऑडियो सह सर्व कॉन्टॅक्टला मेन सर्च टूल बार मध्ये जावून सर्च करू शकते.

Leave a Comment