कुडाळ आऊट पोस्ट ला लागलेले हप्तेखोरीचे ग्रहण कधी संपणार ?

सातारा प्रतिनिधी | जावली तालुक्यांतील कुडाळ पोलीस आऊटपोस्टला हप्त्याचे ग्रहण लागले असुन वरीष्ठ अधिकार्याचा वरदहस्त असल्यामुळे सर्वसामान्यानी तक्रार करुन देखील “आपण सगळे भाऊ मिळुनवाटुन खाऊ “ अशी अवस्था जावली तालुक्यांतील पोलीस दलाची झाली आहे . तालुक्यांत अवैध्य वाळु वाहतुक , मटका , अवैध्य दारु विक्रीत कुडाळ आऊटपोस्टच्या पोलीस अधिकार्याने मलई काढत भरभराटी करुन घेतली . याबाबत वरीष्ठ पोलीस अधिकार्याकडे तक्रार करुन देखील भ्रष्ट्राचार बोकाळलेल्या सातारा जिल्ह्यातील पोलीस विभागाने कोणतीही कारवाई न केल्याने “कुडाळ आऊट पोस्टला लागलेले हप्तेखोरीचे ग्रहण कधी संपणार “ असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकानकडुन व्यक्त होत आहे .

जावली तालुक्याच्या कुडाळ आऊट पोस्टची तक्रार जिल्हाअधिक्षक सातारा याच्याकडे करण्यात आली होती . यातक्रारीवरुन कुडाळ पोस्टच्या संबंधित अधिकार्याच्या चैाकशीचा अहवाल उपविभागीय अधिकारी वाई याच्याकडे पाठवण्यात आला. मात्र उपविभागीय अधिकारी वाई यांनी मेढा पोलीस ठाण्याच्या चैाकशी अहवालाचे पुढे काय केले हा संशोधनाचा विषय झाला आहे . सर्वसामान्यांना नाडवायच अन् दारुची गुत्ते , मटकाकिंग, वाळुसम्राटांना मदत करायची याची बोलकी आकडेवारी न केलेल्या कारवाईच्या आलेखावरुप सहज लक्षात येईल . मात्र वरीष्ठ कुडाळ आऊट पोस्टच्या कारभाराबाबत एक अक्षर न काढतां “हाताची घडी अन् तोडांवर बोट ठेवुन गप्प बसले असल्याची महत्वपुर्ण माहीती समोर आली आहे .

तडीपार दिवट्या कुडाळच्या घरीच भूमिगत आहे
त्याला अभय देण्यासाठी दर महा रतीब लावल्याची चर्चा सध्या कुडाळ मध्ये सुरू आहे दारू सम्राट दीपक वारागडे 1 वर्षासाठी तडीपार आहे मात्र तो जिल्हा बाहेर गेलाच नाही , त्याला कुडाळ मध्ये कुडाळ पोलिसच अभय देत असल्याची चर्चा आहे , तो अबोली धाब्यात लपून बसलेला असतानाही पोलीस मात्र अबोल का?

जावली तालुक्यांतील कुडाळ आऊट पोस्टला लागलेले हप्तेखोरीचे ग्रहण सोडवण्याकरीता मलमपट्टीत वेळ निघुन गेलीए :आता हवी ती शस्त्रक्रीयाच अशी वेळ येवुन ठेपली आहे . सर्वसामान्याना न्याय देण्याकरीता कुडाळ आऊट पोस्टवर आता शस्त्रक्रीया हवीच अशी मागणी सर्वसामान्य नागरीकानमधुन होताना दिसत आहे .

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : http://www.hellomaharashtra.in

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com