कर्नाटक पोलिसांच्या मुस्कटदाबी विरोधात यड्रावकर समर्थक रस्त्यावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
बेळगाव सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव येथे गेलेले महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेतले होते. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर परिसरात यड्रावकर यांच्या समर्थकांकडून रास्ता रोको करण्यात आला.

राजेंद्र पाटील यड्रावकर समर्थकांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला तर काही ठिकाणी टायर देखील जाळण्याप्रकार घडला. यड्रावकर हे महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव येथे गेले होते. परंतु पोलिसांनी त्यांना मज्जाव करत ताब्यात घेतलं, आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या हद्दीत आणून सोडलं. कर्नाटक सरकारने यड्रावकर यांनी कर्नाटक प्रशासनाने दिलेल्या वागणुकीबद्दल त्यांच्या समर्थकांनी रोष व्यक्त करत रास्ता रोको करा केला.

Leave a Comment