ग्रामपंचायत उमेदवारांना दिलासा! अर्ज दाखल करण्याच्या वेळत वाढ; ऑफलाईन अर्जही स्वीकारणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यातील 14 हजार 232 ग्रामंपचांयतीसाठी निवडणूक प्रक्रिया (Gram Panchayat Election candidate) सुरु आहे. अशावेळी ग्रामंपचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवण्यात (application time extended) आल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिली आहे. ग्रामपंचायतीचे उमेदवारी अर्ज आणि जातपडताळणीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीनं स्वीकारण्यात येतील, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.

याशिवाय उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असून अर्ज भरण्याची मुदत ३ वरुन साडे ५ वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहितीही हसन मुश्रीफ यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्यामुळे उमेदवारांची चिंता वाढली होती. अर्ज न भरले जाण्याचीभीती होती ती आता दूर झालेली आहे, असं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.

सर्व्हर ओव्हर लोड
ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याचे आणि जात पडताळणीचं टोकन देण्याचं सर्व्हर ओव्हरलोड झाले होते. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचे आदेश कालच (29 डिसेंबर) काढले आहेत. जातपडताळणीच टोकन सुद्धा ऑफलाईन ठेवले आहे. आता ऑनलाईनची आवश्यकता नाही, ऑफलाईन पण अर्ज करू शकता, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.

ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढल्याने ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी येत होत्या. सर्व्हरवरती लोड आल्याने अनेक ठिकाणी अर्जच भरले जात नव्हते. त्यामुळे काम अत्यंत मंदगतीने सुरू होते. त्याबाबतच्या तक्रारी वाढल्याने अखेर मुंडे यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत दोन दिवस ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राखीव मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment