सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आता राज्य मानवाधिकार आयोगाने घेतली उडी, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । आधी मुंबई पोलीस, बिहार पोलीस, ईडी, CBI यानंतर आता महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात उडी घेतली आहे. राज्य मानवाधिकार आयोगाने रिया चक्रवर्तीच्या कूपर हॉस्पिटलच्या शवागृहात जाण्यावरुन नोटीस बजावली आहे. कोणत्या नियमाच्या आधारे रिया चक्रवर्तीला शवागृहात जाण्याची परवानगी देण्यात आली? नियमानुसार रक्ताचा नातेवाईक असलेली व्यक्तीच पार्थिवाजवळ जाऊ शकते, मग पोलिसांनी रियाला रोखलं का नाही? असे प्रश्न या नोटीसमध्ये हॉस्पिटल आणि पोलिसांना विचारण्यात आले आहेत.

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. रिया चक्रवर्तीचे काही व्हॉट्सऍप चॅट समोर आल्यामुळे या प्रकरणात ड्रग्जचा संशय समोर आला आहे. या व्हॉट्सऍप चॅटमध्ये ड्रग्जबाबत बोलणी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिया ज्या मिरांडा सुशीसोबत चॅटिंग करत होती, तो दुसरा-तिसरा कोणी नसून सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आहे.

ड्रग्जबाबतचे चॅट समोर आल्यानंतर सीबीआय आता सिद्धार्थ पिठानी, कूक केशव ठाकूर, कूक नीरज, हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, स्टाफ दिपेश सावंत यांच्यासोबत ड्रग्जबाबत चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ड्रग्जच्या बाबतीत काही तथ्य असेल, तर हीच माणसं माहिती देऊ शकतात, कारण ते सुशांत आणि रियासोबतच राहत होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment