शिवसेना भाजपसाठी सवतीचे लेकरू? अमित शहांनी विधानसभेसाठी घेतली बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | सावत्र आई सवतीचे लेकरू म्हणून ज्या प्रमाणे मुलाला वागणूक देत असते त्याच प्रकारची वागणूक देण्याचा भाजपचा पुन्हा एकदा इरादा असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील कोअर कमिटीची बैठक घेऊन भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे यासाठी कामाला लागा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या पदरी भाजप पुन्हा निराशाच टाकणार हे मात्र निश्चित झाले आहे.

कार्यक्रमाला दांडी ! कोल्हे-आढळरावांनी आमने-सामने येणे टाळले

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेऊन अमित शहा यांनी निवडणुकीच्या संदर्भात सूचना केल्या आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अमित शहा यांनी शिवसेने सोबत युती करण्याच्या मुद्द्यावर शिक्का मोर्तब केले असून शिवसेने सोबतच अन्य घटक पक्षांच्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा असे देखील अमित शहा म्हणाले आहेत.

पराभव पाहण्यापेक्षा मला मरण का आले नाही : चंद्रकांत खैरे

भाजपच्या या भूमिकेवर शिवसेनेची नेमकी काय भूमिका असणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर आत्ता पासूनच मुख्यमंत्री पदावर दावा सांगणाऱ्या शिवसेनेच्या पदरी पुन्हा निराशाच येणार का याकडे देखील बघावे लागणार आहे.

Leave a Comment