राजू शेट्टींचा आघाडीपेक्षा वेगळा विचार ; विधानसभेचे ‘मिशन ४९’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीत दारुण पराभूत स्वीकारलेले राजू शेट्टी आपला पक्ष अखंडित राखण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे समजते आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधानसभा निवडणुकीसाठी ‘मिशन ४९’ आखले असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जायचं कि नाही याच निर्णय देखील ते लवकरच जाहीर करणार आहेत.

१० वर्ष लोकसभेचा खासदार राहिलेल्या राजू शेट्टी यांना धैर्यशील माने या नवख्या उमेदवाराने अस्मान दाखवले. निवेदिता माने यांची हॅट्रिक रोखत राजू शेट्टी २००९ रोजी पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी २०१४ची निवडणूक देखील भाजप सेनेच्या जोरावर जिंकली. तर मोदी सरकारची शेतऱ्यांविषयी असणारी धोरणे आपल्याला पसंत नसल्याचे कारण पुढं करून राजू शेट्टी यांनी भाजप सेनेला सोड चिठ्ठी देत काँग्रेस राष्ट्रवादीचा रस्ता धरला. त्यांचा हा निर्णय जनतेला पचला नाही. त्यामुळेच त्यांचा जनतेने पराभव घडवून आणला. आता मात्र पराभवातून सावरून राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार केला आहे. पुढील महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकारणी बैठक पार पडणार आहे हि बैठक पार पडल्यानंतर राजू शेट्टी काँग्रेस आघाडी सोबत राहायचं का याचा निर्णय जाहीर करणार आहेत.

दरम्यान राजू शेट्टी काँग्रेस आघाडीची साथ सोडतील काय? या प्रश्नाचं काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पोटात गोळा येऊ लागला आहे. कारण लोकसभा निवडणुकीत त्यांचा देखील दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांच्या सारखा लढवय्या नेता जर साथ सोडून गेला तर ऐन निवडणुकीत विरोधकांची धार कमी होणार आहे. तर आरपीआय गवई गटाने देखील १० जागांची मागणी करत निर्वाणीचा इशारा दिला आहे. हा पक्ष देखील विधानसभेला ५० जागी आपले उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडीला निवडणुकी आधीच फाटाफुटीचे दुःख सहन करावे लागणार काय असा प्रश्न निर्माण झालं आहे.

Leave a Comment