गिरीश महाजन महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी |महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना हटवून मुख्यमंत्री बनण्याचा प्रयत्न बऱ्याच लोकांनी केला आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ते प्रयत्न मुसद्दीपणे परतवून लावले आहेत. मात्र गिरीश महाजन यांच्याकडे राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला अर्थमंत्री पद सांभाळायला जाऊ शकतात. असा कयास बांधून गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री संबोधत त्यांच्या शुभेच्छांचे बॅनरच लावले आहेत.

मोदींचे मंत्रिमंडळ तयार ; हि आहेत त्यांच्या मंत्री मंडळातील नावे

गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात म्हणून गणले जातात. एकनाथ खडसे यांचे प्रस्थ जळगाव जिल्ह्यातून कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनांना बळ दिले. त्याचा महाजनांनी देखील पुरेपूर फायदा उचलून राज्याच्या राजकारणात आपले एक अढळ स्थान निर्माण केले. त्यामुळे त्यांना सर्वच लोक राज्याचे भावी मुख्यमंत्री संबोधतात. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे साहजिक आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या त्या एकमेव खासदाराने घेतली नितिन गडकरी यांची भेट, राजकिय वर्तुळात चर्चांना उधान

गिरीश महाजन यांच्या राजकीय कर्तृत्वाची साक्ष देणारे बॅनर जळगावमध्ये लावण्यात आले आहेत. त्यावर त्यांचा उल्लेख राज्याचे भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. हि वातावरण निर्मिती नेमकी कशासाठी आहे. याचा अंदाज भल्या भल्यांना बांधता आला नाही. मात्र या बॅनरबाजीची जळगाव मध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

सर्वात वेगवान आणि मोफत  बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा 

whatsapp  ग्रुपची लिंकhttp://bit.ly/2EDyi7e

फेसबुक पेजची लिंक http://bit.ly/2YmZejl

महत्वाच्या बातम्या 

काँग्रेसच्या १२ आमदारांनी दिले राजीनामे

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या त्या एकमेव खासदाराने घेतली नितिन गडकरी यांची भेट, राजकिय वर्तुळात चर्चांना उधान

मोहिते पाटलांच्या अकलूजमध्ये भाजपला पडली एवढी मते

भाजप प्रवेशा बाबत विश्वजीत कदमांनी दिली हि प्रतिक्रिया

Leave a Comment