अमोल मिटकरी म्हणजे राजकारणातील विचारांचा काळा डाग; महेश शिंदेंची जळजळीत टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणातील विचारांचा काळा डाग म्हणजे अमोल मिटकरी अशी जहरी टीका शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांनी केली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा पहायला मिळाला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना महेश शिंदे मिटकरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला

अमोल मिटकरी यांचे वर्तन आज संपूर्ण विधिमंडळाने बघितलं आहे. मिटकरी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील विचारांचा काळा डाग आहे. अमोल मिटकरी लोकशाही वादाचा नेता नाही, त्याचे विचार जहाल विचार आहेत, त्यांचे विचार लोकशाही साठी धोकादायक आहेत त्यामुळे माझी त्यांच्या वरिष्ठाना विनंती आहे कि अशा लोकांवर कारवाई करावी असं महेश शिंदे म्हणाले

विरोधकांकडून सातत्याने विधानभवनाच्या पायऱ्यांवरून ५० खोके, एकदम ओके अशी घोषणाबाजी सुरु आहे. पण आम्ही अनिल देशमुखांचे १०० खोकी बारामती एकदम ओके असं म्हणताच राष्ट्रवादीला ते झोंबल. अमोल मिटकरी ५० खोके बाबत ओरडत आहेत. त्यांना माझं आव्हान आहे की गेल्या अडीच वर्षात अजित पवार यांनी बारामतीला किती पैसा पाठवला याची माहिती घ्यावी मग खोके खोके ओरडावं”, असंही महेश शिंदे म्हणाले.