Mahindra Cars Price : Bolero पासून Scorpio पर्यंत महिंद्राच्या सर्व 10 गाड्यांच्या नव्या किंमती काय? फक्त 2 मिनिटांत घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra Cars Price) या कंपनीची देशातील आघाडीच्या वाहन निर्माता कंपन्या मध्ये गणना केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून महिंद्राने देशातील नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मात्र आता महिंद्राने आपल्या नव्या गाड्यांच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे तुम्ही जर महिंद्राची गाडी खरेदी करणार असाल तर सर्वप्रथम या नव्या गाड्यांच्या किमती जाणून घ्या.

Mahindra & Mahindra

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महिंद्रा (Mahindra Cars Price) कंपनी भारतीय बाजारपेठेत त्यांच्या 10 वाहनांची विक्री करते. यामध्ये यामध्ये महिंद्रा बोलेरो, महिंद्रा थार, महिंद्रा मराझो, बोलेरो निओ, XUV500, Mahindra Scorpio, Alturas G4, KUV100 NXT आणि Mahindra XUV700 यांचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला महिंद्राच्या या सर्व वाहनांच्या नवीन किमतींबद्दल सांगणार आहोत. त्यावर एक नजर टाकूया.

Mahindra & Mahindra

 महिंद्रा मॉडेल सुरुवातीची किंमत टॉप अँड व्हेरिएंटची किंमत
1 Mahindra KUV100 NXT (महिंद्रा केयूवी100 एनएक्सटी) 6.06 लाख 7.72 लाख
2 Mahindra XUV300 (महिंद्रा एक्सयूवी300) 8.41 लाख 12.38 लाख
3 Mahindra Bolero (महिंद्रा बोलेरो) 9.33 लाख 10.26 लाख
4 Mahindra Bolero Neo (महिंद्रा बोलेरो नियो) 9.29 लाख 11.78 लाख
5 Mahindra XUV700 (महिंद्रा एक्सयूवी700) 13.18 लाख 19.21 लाख

 

6 Mahindra Scorpio (महिंद्रा स्कॉर्पियो) 13.54 लाख 18.62 लाख
7 Mahindra Marazzo (महिंद्रा मराजो) 13.17 लाख 15.35 लाख
8 Mahindra Thar (महिंद्रा थार) 13.53 लाख 14.22 लाख
9 Mahindra XUV500 (महिंद्रा एक्सयूवी500)  14.16  लाख 19.99 लाख
10 Mahindra Alturas G4 (महिंद्रा अल्तूरस जी4)  28.88 लाख 31.88 लाख

 

Mahindra & Mahindra

महिंद्रा गाड्यांच्या किमती का वाढल्या? (Mahindra Cars Price) 

गेल्या काही काळापासून वाहनांच्या उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे महिंद्रा (Mahindra & Mahindra) गाड्यांच्या किमती वाढल्या आहेत. स्टील, अ‍ॅल्युमिनियमसह इतर कच्च्या मालाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या निर्मितीचा खर्चही वाढला आहे. उत्पादन प्रक्रियेतील वाढत्या किंमतीं कमी करण्यासाठी कंपनीने सर्व प्रयत्न केले. परंतु कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय कंपनीला घ्यावा लागला.

 

हे पण वाचा :

New Mahindra Scorpio : नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ लवकरच लॉंच होणार; पहा काय आहेत गाडीची वैशिष्ट्य

Kia Carens CNG : कियाची कॅरेन्स लवकरच येणार सीएनजी मध्ये; Ertiga ला देणार तगडी फाईट

Maruti Suzuki च्या गाड्या झाल्या महाग; पहा कोणती गाडी किती रुपयांना