अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीची मोठी कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडाळी नंतर राज्यात राजकीय अस्थिरतेची शक्यता निर्माण झाली असतानाच आता शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालना सहकारी साखर कारखान्यावर ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

ईडीने अर्जुन खोतकर यांच्या कारखान्याची जवळपास ७८ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. यात जमीन, एक रेसिडेन्शिलय प्लॅन्ट, एक बिल्डिंग आणि स्ट्रक्चर अशी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरुन ही माहिती देण्यात आली आहे.

तात्पुरत्या स्वरूपात ईडी कडून ही संपत्ती जप्त करण्यात आली आहे . गेल्या दोन महिन्यांपूर्वी ईडीने जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून साखर कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश ईडीने दिले होते. अनेक दिवसांपासून ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे

 

Leave a Comment