नाशिकजवळ मोठी रेल्वे दुर्घटना; 10 डब्बे रुळावरून घसरले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिकमध्ये पवन एक्स्प्रेसचे 10 डब्बे रुळावरुन घसरल्याची दुर्घटना घडली आहे. देवळाली-लहवीत दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात एकाच मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 11.30 वाजता 11061 LTT-पवन एक्सप्रेस सुटली. दुपारी तीनच्या दरम्यान ही एक्सप्रेस नाशिकजवळील देवलाली येथे आली असता Dn मार्गावर अचानक रुळावरून दहा डब्बे घसरले.

दरम्यान, या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु असून आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी रवाना झाली आहे. रेल्वेकडून प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक देखील जारी करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेची माहिती कुटुंबीयांपर्यंत पोहोचावी यासाठी 0253-2465816 (नाशिक) हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.