सांभाळायला दिलेल्या दागिने चोरीला गेल्याचा केला बनाव; मालकाच केला विश्वास घात

औरंगाबाद : विश्वासाने सांभाळायला दिलेल्या दागिने चोरी झाल्याचा बनाव करणाऱ्या ट्रांस्पोट कंपनीच्या व्यवस्थापका सहा त्याच्या मित्रावर जीन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मोहम्मद अझरूद्दीन खान मुजफरोद्दीन खान ( ३२, रा खास गेट) व शेख जमील शेख अली (२४ रा पढेगाव ) असे दोनी अरोपींचे नाव आहे.

हाती आलेल्या माहिती नुसार, मोहम्मद अझरूद्दीन खान मुजफरोद्दीन खान हा गेल्या सात वर्षापासून रज्जाक खान (रा. संजयनगर ) यांच्या मालकीच्या ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करत होता. तो रज्जाक यांचा विश्वासू होता. त्याच्या कडे रज्जाक यांने १४ तोळे सोने, काही चांदी आणि एक लाख रुपये रोख गेल्या सहा महिन्यात पासून आरोपी अझरूद्दीन याला सांभाळायला दिली होती आणि त्याच्या घरच्या कपाटात ते सर्व ऐवज ठेऊन त्याच्या चाव्या स्वतःकडे घेतल्या होत्या. मात्र २४ जून रोजी कोणीतरी कपात तोडून ते सर्व चोरल्याची माहिती अझरूद्दीन याने खान यांना दिली.

दरम्यान, खान यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तपास करण्यास सुरवात केली असता त्यातून असे निष्पन्न झाले कि हि घटना चोरीची नसून चोरीच्या बनावाची आहे. त्यांनतर शनिवारी दोन्ही आरोपींना चौकशीसाठी ठाण्यात बोलावले आणि त्याच्या विरोधातील पुरावे जमा करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.