Business Idea : अशा प्रकारे फुलांच्या व्यवसायाद्वारे मिळवा भरपूर पैसे !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : जर आपल्याला कोणताही व्यवसाय करायचा असेल तर तो वर्षभर चालेल असा करावा. म्हणजेच त्याला वर्षभर मागणी असायला हवी. हंगामी व्यवसायांना वर्षभर चांगले उत्पन्न मिळू शकत नाहीत. अशा परिस्थितीत नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. जर आपणही कमी गुंतवणुकीत भरपूर नफा देणाऱ्या एखाद्या व्यवसायाच्या शोधात असाल तर आपल्याला फुलांचा व्यवसाय सुरु करता येईल.

फुलांचा व्यवसाय हा कमी पैशांत आणि जागेतही सुरू केला जाऊ शकतो. तसेच फुलांना वर्षभर मागणी देखील असते. यातून आपल्याला चांगला फायदा देखील होऊ शकेल. गेल्या काही वर्षांत लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्येही सजावटीसाठी फुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली असून फुलांच्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे उत्पन्न देखील चांगलेच वाढले आहे. Business Idea

How traditional flower business is attaining new identity?

अशा प्रकारे करता येईल सुरुवात ???

फुलांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला जास्त पैसे गुंतवण्याची गरज नाही. यामध्ये सुरुवातीला एक लाख रुपयांची गुतंवणूक करूनही हे काम सुरू करता येईल. तसेच यासाठी कोणत्याही महागड्या उपकरणांची गरज देखील नसते. यासाठी 1000-1500 चौरस फूट जागाच लागणार आहे. याबोबरच फुले ठेवण्यासाठी डीप फ्रीझर, फुले तोडणे, बांधणे, पुष्पगुच्छ बनवणे इत्यादीसाठी काही उपकरणांची खरेदी देखील करावी लागेल. तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार दररोज फुले आणावी लागतील. Business Idea

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला मंदिर, कार डेकोरेशन मार्केट किंवा जिथे जास्त ऑफिसेस असतील अशा ठिकाणी दुकानासाठी जागा शोधावी लागेल. कारण अशा ठिकाणी जास्त विक्री होण्याची शक्यता असते. तसेच कोणत्या फुलाला मागणी जास्त आहे, हे लक्षात ठेवावे लागेल. जर आपल्याला थेट शेतकर्‍याकडून फुले आणता आली तर आपला खर्चही कमी होईल. कारण बाजारातील फुले तुलनेने थोडी महाग असतील. Business Idea\

Flower Shop Business Plan Sample [Update 2022] | OGScapital

अशा प्रकारे विक्री करता येईल

आजकाल मंदिरातील सजावट, गाड्याची सजावट, सोहळ्यासाठी फुलांचा जास्त वापर केला जात आहे. अशा परिस्थितीत, आपल्याला मंदिरात जाणारे भाविक, वेडिंग प्लॅनर आणि कार सजावट करणाऱ्यांना फुले विकता येईल. एकाच वेळी जास्तीत जास्त फुलांची विक्री करण्यासाठी आपल्याला विवाह किंवा इतर तत्सम कार्यक्रम करणाऱ्या लोकांशी कॉन्टॅक्ट करावा लागेल. कारण, सजावटीसाठी फुलांची भरपूर गरज असते. जर आपल्याला अशी लोकं ग्राहक म्हणून मिळाली तर मोठ्या प्रमाणात फुले विकता येईल. तसेच याव्दारे चांगले उत्पन्नही मिळेल. तसेच आपल्याला ऑनलाइन देखील फुले विकता येईल.

किती उत्पन्न मिळू शकेल ??? 

बाजारातील भावानुसार फुलांच्या किंमती दररोज बदलत असतात. शेतकर्‍यांकडून ज्या किंमतीत फुले मिळतात त्यापेक्षा दुप्पट भावाने फुले बाजारात मिळतात. जर एखादे फूल 3 रुपयांमध्ये विकत घेतले तर ते बाजारात 7-8 रुपयांना अगदी सहजपणे विकले जाईल. काही महागड्या फुलांमध्येही जास्त कमाई करता येते. फुलांच्या व्यवसायाद्वारे मिळणारी कमाई आपण किती विक्री करतो आहे यावर अवलंबून असते. आपण जितकी जास्त विक्री करू तितकी जास्त कमाई होईल. Business Idea

So, you want to open a flower shop?

व्यवसायासाठी कर्ज मिळवण्यासाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.startupindia.gov.in/content/sih/en/government-schemes/micro-units-development-refinance-agency.html

हे पण वाचा :

Business Idea : सेंद्रिय खतांचा व्यवसाय करून मिळवा लाखो रुपये !!!

Business Idea : ‘या’ शेतीद्वारे कमी खर्चात मिळवा 5 पट नफा !!! कसे ते जाणून घ्या

Business Idea : कमी पैशांत ‘या’ व्यवसायाद्वारे करा भरपूर कमाई !!!

Gold Price Today : सोने-चांदीमध्ये घसरण, आजचे नवीन दर पहा

PAN-Aadhaar Link : आता 30 जूनपर्यंत पॅन-आधार लिंक केले नाही तर द्यावा लागणार दुप्पट दंड !!!

Leave a Comment