प्रेरणादायी | प्रत्येक माणूस दिवसाला साधारण ६०-६५ हजार विचार करत असतो. मात्र यातील ९० टक्के विचार नकारात्मक किंवा अनावश्यक असतात. या अनावश्यक्य विचारांमुळे आपल्याला मानसिक थकवा येतो. एखादी गोष्ट किंवा विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी केलेला विचार चांगला असतो, तो आपल्याला प्रगती पथावर घेऊन जाणार असतो. मात्र एखाद्या गोष्टीवर आपण काही उपाय करू शकत नाही, त्याचा निष्कारण विचार करत बसतो यालाच नकारात्मक किंवा अनावश्यक विचार करणे म्हणतात.हे विचार आपल्या मनात फक्त मानसिक ताण, नैराश्य आणि चिंता निर्माण करतात.
नकारात्मक विचारांनी फक्त आपले नुकसानच होते त्यामुळे ते विचार थांबविणे किंवा त्यांचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. यासाठीकाही उपाय पाहुयात…
१) आपल्या विचारांवर लक्ष ठेवणे – आपल्या मनात कोणते विचार येतात हे आपल्याला काळात देखील नाही. बऱ्याचदा आपण एक विचार करत असतो आणि एकमागे एक असे अनेक विचार आपल्या मनात येत राहतात. विनाकारण आपण या विचारांमध्ये आपला वेळ वाया घालवतो, त्यामुळे विचारांवर लक्ष ठेवल्याने विचार कमी होतील त्याचबरोबर फालतू काय आहे आणि महत्वाचे काय आहे हे पाहणे गरजेचे आहे.
२) स्वीकार करणे – आपल्या जीवनात बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे घडत नाहीत याचा विचार आपण सतत करत राहतो. याचा परिणाम आपल्या कामावर होतो असतो. कोणत्याही गोष्टीला विरोध केल्याने मन अशांत होते, मात्र काही गोष्टी आपल्या हातात नसतात त्या स्वीकारल्याने मनातील विचार कमी होण्यास मदत होते.
३) चांगली कृती करा – दुसऱ्यांना बदलने आपल्या हातात नसते. त्यामुळे दुसऱ्यांनी केलेल्या कृत्यांवर विचार करत बसल्याने आपलेच नुकसान होते.आपल्या मनात नकारात्मक विचारांची वाढ होते. यासाठी आपण आपल्या कृतीतून दुसऱ्यांमध्ये चांगले बदल घडू शकतो त्यासाठी आपण चांगली कृती करणे गरजेचे आहे.
४ ) ध्यान – विचारांवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर ध्यान करणे फार महत्वाचे आहे. ध्यान केल्याने मनाला शांती भेटते तसेच विचारांची संख्या कमी होण्यास मदत होईल. ध्यान केल्याने मनावर प्रभुत्व मिळवता येऊ शकते.