‘या’ म्हशीसोबत सेल्फी काढण्यासाठी लागतेय शेतकर्‍यांची लाईन; एका दिवसात फस्त करते 15 लिटर दुध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील तासगाव मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात खास आकर्षण ठरतोय तब्बल दीड टन वजन असणारा गजेंद्र नावाचा रेडा. या दीड टनाच्या रेड्याला पाहण्यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रदर्शनात भली मोठी गर्दी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून शिवार कृषी प्रदर्शन भरवण्यात येत आहे. यंदाही हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

गजेंद्र चा रोजचा खुराक म्हणजे त्याला दिवसाला 15 लिटर दूध, बक्कळ ऊस, गवत आणि इतर खाद्य लागते. या गजेंद्र ला तब्बल 80 लाखाला मागणी सुद्धा आली होती. 16 डिसेंबर पासून या प्रदर्शनास सुरवात झाली असून 20 डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन असणार आहे. या प्रदर्शनात काल डॉग शोचे आयोजन करण्यात आले होते. तर, आज प्रदर्शनात खास आकर्षण ठरले ते दीड टनाच्या गजेंद्र रेड्याचे. ह्या दीड टनाच्या रेड्याला पाहण्यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रदर्शनात भली मोठी गर्दी केली होती.

'या' म्हशीसोबत सेल्फी काढण्यासाठी लागतेय शेतकर्‍यांची लाईन; एका दिवसात फस्त करते 15 लिटर दुध

महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरील मंगसुळी गावातील विलास नाईक यांच्याकडील हा गजेंद्र रेडा आहे. या गजेंद्र चा रोजचा खुराक म्हणजे त्याला दिवसाला 15 लिटर दूध, बक्कळ ऊस, गवत आणि इतर खाद्य लागते. नाईक यांच्या घरच्या गीर म्हशींचा हा रेडा आहे. या रेड्याला पाहण्यासाठी हजारो किलोमीटरवरून लोक येत आहेत. तर, या गजेंद्र ला तब्बल 80 लाखाला मागणी सुद्धा आली होती. पण, मालकांनी घरची पैदास असल्याने गजेंद्रला विकले नाही. आता पर्यंत गजेंद्रला कर्नाटक सह चार प्रदर्शनात मालकाने नेले होते आणि आज सांगलीच्या तासगाव येथे शिवार प्रदर्शनात तो आला आहे आणि खास आकर्षण बनला आहे.

Leave a Comment