राज्यपाल कोश्यारींची महाराष्ट्रातून हकालपट्टी करा; भाजप नेत्यानेच केली मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते असं वादग्रस्त विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर राज्यात सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. राज्यपालांच्या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले असून केंद्राने त्यांना परत दिल्लीला बोलवून घ्यावे अशी मागणी केली जात आहे. त्याच दरम्यान, भाजपचे नेते तथा माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी प्रतिक्रिया दिली असून “भाजपमधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करा,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.

नागपुरचे भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर निघायला पाहिजे. २०१४ ला छत्रपती शिवरायांची साथ घेवूनच मोदीजी पंतप्रधान झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन करणार नाही.

राज्यपाल कोश्यारी नेमकं काय म्हणाले ?

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दिक्षांतर समारंभ पार पडला या कार्यक्रम सोहळ्यात बोलत असताना भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते असं वादग्रस्त विधान केलं. आम्ही जेव्हा शाळेत असताना आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मात्र तुम्हाला जर कोणी विचारले तर तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची गरज नाही. इथेच मिळतील तुम्हाला… शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे असं म्हणत आता डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत सर्व आदर्श तुम्हाला मिळतील असं कोश्यारी म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले.