ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत बलाढ्य भाजपला अस्मान दाखवणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यात राज्यपाल धनकर, टीएमसी नेते आणि अभिषेक बॅनर्जी आणि पक्षाचे राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर उपस्थित होते.ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने तब्बल 231 जागा जिंकत एकहाती सत्ता काबीज केली.

या शपथविधीनंतर राज्यपाल धनकर यांनी ममता बॅनर्जींचं अभिनंदन केलं आणि सध्या चाललेला हिंसाचार थांबवून पुन्हा एकदा शांतता व सुव्यवस्था स्थापन करण्यास सांगितलं आहे. दरम्यान, बंगालमध्ये आता ममता बॅनर्जी यांच्यासमोर करोना साथ रोखण्याचे मोठे आव्हान आहे.

ममता बॅनर्जी यांनी प्रतिकूल परिस्थितीत देखील मोदी- शहा आणि पर्यायाने भाजपला हादरा देत एकहाती सत्ता काबीज केली. संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ ममतादिदींच्या विरोधात ठाकले असताना देखील ममता बॅनर्जी यांनी आपली लढाऊ वृत्ती दाखवत भाजपला अस्मान दाखवले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like