तरुणाच्या एका कृतीमुळे बस डोक्यावरून जाऊनही त्याचा वाचला जीव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आपण आतापर्यंत अनेक अपघाताचे (accident) व्हिडिओ पहिले असतील. मात्र सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही म्हणाल नशीब असावे तर असे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, एका तरुणाच्या डोक्यावरून बस गेली. पण तरी त्या तरुणाला काहीच झालं नाही. भय़ंकर अपघातातूनही (accident) तरुण बचावला. कुणी याला त्याचं नशीब म्हणेल, तर कुणी चमत्कार. पण खरंतर तरुणाच्या एका छोट्याशा कृतीने त्याचा जीव वाचला आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना वारंवार दिल्या जातात. त्याबाबत जनजागृती केली जाते. पण तरी कित्येक लोक त्याकडे कानाडोळा करतात, दुर्लक्ष करतात, या नियमांना हलक्यात घेतात. पण ड्रायव्हिंगसंबंधी असाच एक नियम पाळल्याने एका तरुणाचा जीव वाचला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, एक बस येताना दिसते. ती रस्त्यावर टर्न घेते त्याचवेळी समोरच्या दिशेने एक बाईकस्वार भरधाव येत असतो. बाईकस्वार त्या बसला धडकतो आणि बसच्या खाली (accident) जातो. अगदी बसच्या चाकाजवळच तो असतो. बसचालकालाही बाईकस्वार बसच्या खाली आल्याचे समजते व तो तातडीने बसला ब्रेक मारतो. मात्र ती बस थांबेपर्यंत गाडीचं चाक त्या तरुणाच्या डोक्याजवळ (accident) आलेलं असतं.

या तरुणाने बाईक चालवताना डोक्यावर हेल्मेट घातलेलं होतं. जेव्हा तो बसखाली येतो तेव्हा त्याचं हेल्मेट डोक्यातून वरच्या बाजूने थोडं बाहेर पडतं आणि याच हेल्मेटवर बसचं चाक जातं आणि गाडी त्याचक्षणी (accident) थांबते. त्यामुळे या तरुणाचा जीव वाचला आहे. जर या तरुणाने हेल्मेट घातले नसते तर त्याचे बसच्या चाकाखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू (accident) झाला असता.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर

Leave a Comment