विकृतीचा कळस ! स्वतःच्याच बायकोचा अश्लील व्हिडीओ बनवला

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विकृताने आपल्याच बायकोचा अश्लील व्हिडीओ बनवला आहे. या विकृताला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आपली बायको आपल्याला खूप त्रास देते अशी तक्रार घेऊन तो स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये गेला होता, तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. हे दांपत्य पुण्यामध्येच राहते. या प्रकरणातील आरोपी हा देहू, पिंपरी-चिंचवड, भोसरी अशा भागांमध्ये प्लंबर म्हणून काम करतो. तर त्याची पत्नी घरकाम, मासेविक्री करून आपले घर चालवतात. या जोडप्याला दोन मुली आहेत. आरोपीने देहू रोड पोलीस ठाण्यामध्ये आपल्या पत्नीविरोधात तक्रार दाखल केली होती.

पतीने केलेल्या तक्रारीत आपली बायको आपल्याला घरी खूप छळते असे नमूद केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या पत्नीला चौकशीसाठी बोलावले. तेव्हा त्याच्या पत्नीने आपल्या पतीचे सगळे कारनामे सांगितले. आरोपी तिला घरी छळत असे. उपजीविकेसाठी प्लंबिंग करायचे सोडून तो घरातील कोणतीही जबाबदारी उचलत नव्हता. गेल्या दीड वर्षांपासून हे सर्व सुरू असल्याचे त्याच्या पत्नीने पोलिसांना सांगितले. त्यांच्यात कधीतरी वाद होत होता. तसेच तो तिला मारहाण करत असल्याचे देखील पत्नीने सांगितले आहे.

बायकोने केलेला खुलासा ऐकून पोलिसांनी या महिलेच्या नवऱ्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याचा मोबाईल फोनही ताब्यात घेऊन तो तपासला असता त्यात त्याच्या पत्नीचा अश्लील व्हिडीओ दिसला. ते पाहून पोलीससुद्धा चक्रावले आहेत. या व्हिडीओवरून पोलिसांनी त्याला विचारले असता त्याने बायको आंघोळीला गेली असताना हा व्हिडीओ बनवल्याचे कबुल केले. यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आयपीसी 345 ए अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

You might also like