धक्कादायक ! दारूची चटक भागवण्यासाठी आरोपीने उचलले ‘हे’ पाऊल

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेड शहरातील चिरागगल्ली परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये आरोपीने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत आपल्या धाकट्या भावाची निर्घृणपणे हत्या केली आहे. हि घटना उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी भावाला अटक केली आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
अरुणसिंह बालाजीसिंह ठाकूर असे मृत तरुणाचे नाव आहे तर जुगनूसिंह ठाकूर असे आरोपी तरुणाचे नाव आहे. हे दोघेही नांदेड शहरातील चिरागगल्ली परिसरातील रहिवासी आहेत. या प्रकरणी मृत तरुणाची आई गंगाबाई ठाकूर यांच्या फिर्यादीवरून इतवारा पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी जुगनूसिंह यानं घटनेच्या दिवशी 23 फेब्रुवारी रोजी आपला धाकटा भाऊ अरुणसिंह यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती. पण अरुणसिंह यानं पैसे देण्यास नकार दिला. यामुळे आरोपीला राग आला आणि त्याने याच रागातून अरुणसिंहला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हि मारहाण एवढी भयंकर होती कि या मारहाणीत अरुणसिंहचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली. दारूच्या पैशांसाठी लहान भावाचा जीव घेतल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे. इतवारा पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.