धक्कादायक ! प्रियकरानं प्रेयसी समोरच केली तिच्या आईची हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडोनेशियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका युवतीनं आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्या आईची हत्या केली आहे. यानंतर आईचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून टॅक्सीमध्ये टाकून दोघेही फरार झाले आहेत. या प्रकरणी संबंधित युवतीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. सध्या दोघंही तुरुंगात आहेत. इंडोनेशियामधील हीथर मॅक नावाची युवती टॉमी शेफरवर प्रेम करत होती. दोघंही अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते.

याचदरम्यान युवती हीथर मॅक गर्भवती राहिली. ही गोष्ट तिच्या आईला समजली. यानंतर आईला प्रचंड राग आला आणि तिनं मुलीला घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली. आईची नाराजी पाहून हिथरही चिंतेत होती. यानंतर तिनं आपला प्रियकर टॉमी शेफरसोबत मिळून 2015 मध्ये 62 वर्षीय शीला वॉन मॅक यांची हत्या करण्याचा प्लॅन केला. हीथर आणि शेफर यांचं शीला वॉनसोबत बालीच्या एका हॉटेलमध्ये भांडण झालं. यानंतर शेफरनं हीथरची आई शीला वॉनच्या डोक्यावर धारदार शस्त्रानं वार करत तिची हत्या केली. यानंतर त्यांनी महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून जंगलात फेकण्याचा प्लॅन केला.

मात्र, टॅक्सीमध्ये मृतदेह घेऊन जात असतानाच ते पकडले गेले. या प्रकरणात हीथरला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तर तिचा बॉयफ्रेंड टॉमीला 18 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. शेफरनं कोर्टात हत्येची कबुली दिली आहे. मात्र, त्यानं असा दावा केला, की शीला वॉन यांच्यासोबत सुरू असलेल्या वादात तो स्वतःचा बचाव करत होता. शेफरनं सांगितलं, वॉन या गोष्टीमुळे नाराज होत्या की त्यांची मुलगी गर्भवती होती. शील वॉन यांच्यावर हल्ला झाला तेव्हा हीथर बाथरूममध्ये लपली होती. मात्र, हत्येनंतर तिनं मृतदेह सुटकेसमध्ये भरण्यात आपल्या प्रियकराची मदत केली होती.

You might also like