कानाखाली मारल्याने आरोपीने मुलाला चालत्या रेल्वेतून बाहेर फेकलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आपण अनेकदा जागेवरून बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये वाद झाल्याचे पहिले असेल. काही वेळा हे वाद एवढ्या टोकाला पोहोचतात कि पार हाणामारीपर्यंत पोहोचतात. अशाच एका ट्रेनमधील हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये दिसत आहे कि एक पुरुष आणि एका मुलामध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला, त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली आणि रागात त्या व्यक्तीने मुलाला चालत्या ट्रेनमधून खाली (man throw boy from running train) ढकलून दिले. हि संपूर्ण घटना ट्रेनमधील कोणीतरी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय घडले नेमके?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, एक पुरुष आणि एक मुलगा दरवाजाजवळ बसले आहेत. त्यांच्यामध्ये वाद होतो हा वाद हाणामारीपर्यंत (man throw boy from running train) पोहोचतो. यानंतर तो मुलगा त्या व्यक्तीच्या कानशिलात मारतो. मग काय त्या व्यक्तीला इतका राग येतो की ती त्याला थेट धक्का देऊन चालत्या ट्रेनमधून खाली (man throw boy from running train) ढकलून देते.

हि ट्रेन एवढी स्पीडमध्ये आहे कि त्या मुलाचा नक्कीच जागी मृत्यू (man throw boy from running train) झाला असेल. या सगळ्या प्रकारानंतर ती व्यक्ती गप्पपणे ट्रेनच्या आत येते. जसं काहीच झालं नाही. अगदी निवांत, शांतपणे ती बसते. ही घटना नेमकी कोणत्या ट्रेनमध्ये घडली ? कधी आणि कुठे घडली? हे मात्र अजून समजू शकलेले नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात
Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर
भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…