हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज पेगॅसस प्रकरणाबाबत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजपा कार्यालयावर मोर्चा काढला. यावरून आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनीही काँग्रेस विरोधात रस्त्यावर उतरत घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी जोरदार राडाही केला. दरम्यान यावरून मुंबई भाजपा अध्यक्ष तथा आमदार मंगल प्रभात लोढा यांनी काँग्रेसवर टीका करीत निशाणा साधला. “टिपू सुलतानाच्या औलादांनी भाजपावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना त्याचं पद्धतीने उत्तर देऊ, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
मुंबईत भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनावेळी मंगल प्रभात लोढा यांनी ट्विट करीत इशारा दिला. यावेळी ते म्हणाले की, “टिपू सुलतानाच्या औलादांनी भाजपावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल. आम्ही संघर्ष करणारी लोक आहोत. भाजपा कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा आमचीही मागे हटणार नाही,” असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
जो कोणी विनाकारण मुंबई भाजपच्या अंगावर येईल, त्याला शिंगावर घेण्याची ताकद भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे.
हे काँग्रेसने लक्षात ठेवावे! pic.twitter.com/8QSjnxn9oK— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) February 2, 2022
दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्र घेत काँग्रेस कार्यकर्त्याच्या अटकेचीही मागणी पोलिसांकडे केली. तसेच युवक काँग्रेसचा हा मोर्चा यशस्वी होऊ न देण्याच्या दृष्टीने भाजपा कार्यकत्यांना त्या आंदोलकांना हुसकावले.