Monday, January 30, 2023

जिंकलस भावा! शेतकऱ्याचा मुलगा जाणार टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

- Advertisement -

दुबई । एका खेडेगावातील शेतकऱ्याचा मुलगा आता थेट भारतीय संघाबरोबर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे आता पाहाला मिळत आहे. ही बातमी जेव्हा त्याच्या शेतकरी वडिलांनी तेव्हा ते भावुक झालेले पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणारा हा शेतकरी पुत्र म्हणजे दयानंद गरानी. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय संघ सपोर्ट स्टाफ म्हणून दयानंद यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण या दौऱ्यावर जात असताना भारतीय संघापुढे एक प्रश्न निर्माण झाला होता. भारतीय संघाला जी व्यक्ती गोलंदाजी (थ्रो-डाऊन) करून सराव देत असते त्या रघू यांना करोना झाला आहे. त्यामुळे त्यांच्याजागी कोणाला भारतीय संघाबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये न्यायचे हा मोठा प्रश्न होता. आयपीएल सुरु असताना किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघात दयानंद गिरानी हे फलंदाजांकडून सराव करून घेत असल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान आता त्यांना ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात संधी देण्यात आली आहे.

- Advertisement -

दयानंद पुढे म्हणाले की, ” मी कधी या गोष्टीचा विचारही केला नव्हता. माझ्यासाठी हा एक सुखद धक्काच आहे. भारतीय संघाबरोबर एखाद्या दौऱ्यावर मी कधी जाईन, याचा स्वप्नातही मी विचार केली नव्हता. पण आता ही गोष्ट घडताना दिसत आहे. त्यामुळे नक्कीच मी आनंदी आहे.” “ही गोष्ट जेव्हा त्याने आपल्या शेती करणाऱ्या वडिलांना सांगितली, तेव्हा ते भावुक झालेले पाहायला मिळाले. आनंदामुळे त्यांच्या तोंडून शब्दही बाहेर येत नव्हते. आज खऱ्या अर्थाने माझे आणि माझ्या कुटुंबियांचे स्वप्न साकार झाले आहे,” असे दयानंद गरानी बोलत होता.

कोलकातामधील मिंदापूर जिल्ह्यातील जामठिया या खेडेगावात दयानंद राहतात. त्यांचे वडिल याच गावात शेती करतात. दयानंद हे लहानपणी जिम्नॅस्टिक खेळायचे. त्यानंतर त्यांचा क्रिकेटमध्ये रस वाढला. दयानंद हे सध्या कोलकातामधील ट्राफिक पोलिस विभागात स्वयंसेवक म्हणून काम करतात. त्याचबरोबर क्रिकेटमध्ये थ्रो-डाऊन करण्याचेही ते काम करतात. फलंदाजांना जेव्हा सलग वेगवान चेंडू खेळायचे असतात तेव्हा त्यांना थ्रो-डाऊन करणाऱ्य व्यक्तीची गरज भासते. आपल्याला ज्या टप्प्यावर वेगाने चेंडू हवे आहेत, ते फलंदाज सांगतो आणि थ्रो-डाऊन करणारा व्यक्ती त्यांच्याकडून तसा सराव करून घेत असतो.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in