उपजिल्हा रूग्णालयातील गैरसोयींबाबत मनोज माळी यांचे अमरण उपोषण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड, पाटण व कडेगाव तालूक्यातील गोरगरीब रूग्णांच्या दृष्टीने अत्यंत महात्वाच्या असलेल्या कराडच्या उपजिल्हा रूग्णालयातील गैरसोयी दुर कराव्यात. यासाठी 5 ते 6 वर्षांपासून पाठपुरावा करूनही गैरसोयी दुर होत नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मनोज माळी व भानुदास डाईंगडे यांनी आज गुरूवार दि. 5 मे पासुन उपजिल्हा रूग्णालयाच्या प्रवेशव्दारासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त डॉक्टरांची पदे भरावीत, एमआरआय मशिन, सिटीस्कॅन मशिन व तज्ञ उपलब्ध करावेत, रेडीओलॉजीस्ट उपलब्ध करावा, ट्रामा केअर सेंटर सुरू करावे, 200 बेडचे रूग्णालय मंजुर करावे, डायलेसीस स्टाफ व वर्ग 4 ची पदे भरावीत आदी मागण्या करण्यात आल्या आहे. यासाठी नोहेंबर 2017 मध्ये 4 दिवस उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन पुणे विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सर्व मागण्याची पुर्तता करण्याचे लेखी अश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते.

मात्र यानंतर चार ते पाच वर्षांपासून वारंवार पाठपुरावा करूनही मागण्याची पुर्तता न झाल्याने गोरगरीब रूग्णांना आरोग्य सेवेपासून वंचित रहावे लागत आहे. यासाठी गुरूवारपासून मनोज माळी व भानुदास डाईंगडे यांनी पुन्हा अमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी मनोज माळी म्हणाले की, महाराष्ट्राचे पहिले मुख्यंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी सौ. वेणुताई चव्हाण यांच्या नावाने सुरू असलेल्या कराडच्या उपजिल्हा रूग्णालयाकडे शासन व आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रूग्णांचे हेळसांड होत आहे.

उपजिल्हा रूग्णालयात एम. डी. फिजीशीयन, आर्थोपेडीक, भुलतज्ञ, रेडिओलॉजीस्ट, स्त्री रोग तज्ञ, दंत चिकिस्तक, डायलेसीस व वर्ग 4 ची पदे कायमस्वरूपी भरावी. तसेच सीटी स्कॅन मशिन व ट्रामा केअर सेंटर त्वरीत सुरू करावे. उपजिल्हा रूग्णालयाला 200 बेडचे रूग्णालय मंजुर करावे, असे मनोज माळी म्हणाले. उपोषण सुरू करण्यापुर्वी दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले. यावेळी, शिवाजी चव्हाण, सुरज पाटील, संदीप पाटील, बंटी मारे, अक्षय कोरे, सतीश माने, सागर चव्हाण, प्रविण शिंदे, अमित पाटील, बाळू साळवे, नितीन गाडे, तिरू देवकर, अक्षय कापरे, शुभम पाटील, शरद जगताप, गजेंद्र सोंडे, संदिप पवार व कार्यकर्ते उपस्थीत होते.