व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शहरातील ‘या’ 15 लॅबला मनपाने बजावली नोटीस

औरंगाबाद – शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. असे असताना ॲन्टीजेन व आरटीपीसीआर चाचण्या करण्यास टाळाटाळ करणाऱ्या 15 लॅबला महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी काल सांगितले.

कोरोना संसर्गाच्या काळात राज्य शासनाने आरोग्य यंत्रणा सतर्क केल्या आहेत. कोरोनाच्या जास्तीत जास्त चाचण्या झाल्या पाहिजे, यासाठी लॅबची संख्या वाढविली जात आहे. त्यासाठी दर देखील निश्‍चित करण्यात आले आहेत. महापालिकेकडून शहरातील 39 खासगी प्रयोग शाळा (लॅब) चालकांनी ॲन्टीजेन, आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी परवानगी घेतली. त्यासाठी रुग्ण स्वत:हून लॅबमध्ये तपासणीसाठी आल्यास 100 रुपये, तपासणी केंद्रावरून नमुने घेतल्यास 150 रुपये, रुग्णांच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास 250 रुपये या प्रमाणे शुल्क ठरविण्यात आले आहेत. मात्र, परवानगी घेतल्यानंतरही खासगी लॅब चालकाकडून कोरोनाच्या ॲन्टीजने, आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. 39 पैकी 24 लॅबमध्ये चाचण्या होत आहेत. पण उर्वरित 15 चालकांनी अद्याप एकाही चाचणी केलेली नाही. त्यामुळे या लॅबचालकांना परवानगी रद्द का करू नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

या 15 लॅबचा आहे समावेश –
एमआयटी हॉस्पिटल, एशियन सिटी केअर, मराठवाडा लॅब रोशनगेट, मिल्ट्री हॉस्पिटल छावणी, यशवंत गाडे हॉस्पिटल गारखेडा, आयएमए हॉल शनिमंदिरजवळ, गणेश लॅबोरेटरी सर्विसेस पुंडलीकनगर, ओरीयन सिटी केअर हॉस्पिटल गुरुगोविंदसिंगपूरा, अमृत पॅथालॉजी लॅब जालना रोड, सुमनांजली नर्सिंग होम लाडली हॉटेलजवळ, युनिसेफ पॅथॉलॉजी लॅब, भडकलगेट, कृष्णा डायग्नोस्टिक, कस्तुरी पॅथ लॅब गारखेडा, सह्याद्री हॉस्पिटल सिडको एन-2 आदी.