मनपाने पदभरती प्रकिया राबवावी – पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : मनपाने आपल्या स्तरावर पदभरती प्रकिया राबवण्याचे निर्देश राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. शहर विकासाची प्रकिया गतिमान करण्याच्या दुष्टीने महानगरपालिकेत पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मानपाच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री यांनी संबंधितना निर्देशीत केले.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कापोर्शन लिमिटेडचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे आदींची उपस्थिती होती. पालकमंत्री देसाई यांनी शासनाने मानपाच्या पदभरतीच्या आकृतीबंधास मान्यता दिलेली असून स्वायत्ता संस्था असल्यामुळे मानपाला आपल्या स्तरावर पदभरती प्रकिया राबवण्याचे अधिकार असल्याचे सांगून त्या माध्यमातून कंत्राटी पद्धती नियुक्ती, सेवानिवृत्त धारकांना मुदत वाढ या पद्धतीने मानपाने भरती करण्याचे निर्देश दिले.

सर्व विकास कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करून घनकचरा व्यवस्थापन प्रकियेची सर्व केंद्र डिसेंबर पर्यंत पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे निर्देशित केले. सहा महिन्या पर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आणि एकत्रित प्रयत्नातून शहराचया पाणी पुरवठ्यात वाढ करण्यासाठीचे प्रयत्न करावे. शहराच्या जुन्या भागात ज्या ठिकाणी पाणी पाईपलाईन दुरुस्ती आवश्यक असेल त्या ठिकाणी ती लवकरात लवकर करून घ्यावी, असे निर्देश केले.

Leave a Comment