धक्कादायक! जनरेटरच्या वायरिंगमुळे पिकअप वाहनात करंट पसरून 10 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये रविवारी रात्री एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एका पिकअप व्हॅनला विद्युत प्रवाह (many died multiple injured due to electrocution) लागून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले सर्व लोक कावडधारी होते. पिकअपमध्ये एकूण 27 लोक होते. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. पिकअपच्या मागील बाजूस लावलेल्या जनरेटरच्या वायरिंगमुळे (many died multiple injured due to electrocution) हि दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना जलपाईगुडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पिकअप व्हॅनमध्ये एकूण 27 लोक होते. यापैकी 16 जणांना जलपाईगुडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 10 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पिकअप व्हॅनमधील डीजे सिस्टीमच्या जनरेटरच्या वायरिंगमुळे (many died multiple injured due to electrocution) हि दुर्घटना घडली आहे. या वायरिंगमुळे विद्युत प्रवाह संपूर्ण वाहनात पसरला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना जलपाईगुडी येथील रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेनंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांकडून हि पिकअप जप्त करण्यात आली आहे. या अपघाताचे नेमके कारण समजण्यासाठी पोलिसांकडून चालकाचा शोध सुरु आहे.

हे पण वाचा :
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त; पवारांचा मोठा निर्णय

हा तर ‘मविआ’च्या प्रामाणिक प्रयत्नांचा विजय; ओबीसी आरक्षणाबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया

मंत्रिपदासाठी 100 कोटींची मागणी; 4 जणांना अटक

हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय; कोर्टाच्या निकालानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

2 आठवड्यात निवडणुका जाहीर करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश