मॅप्रो. फुड्स कंपनीतील चोरीचा छडा : वाई पोलिसांनी 35 लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

गुन्हे प्रकटीकरण विभाग वाई पोलीस स्टेशन कडुन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली असून चोरट्याकडून तब्बल 35 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. मॅप्रो. फुड्स प्रा. लिं. शेंदुरजणे या कंपनीतील चोराचा छडा लावण्यात वाई पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 मे रोजी धनराज त्रिंबक बुंदगे (रा. गंगापुरी वाई, ता. वाई जि. सातारा) यांनी वाई पोलीस ठाण्यात हजर राहुन तक्रार दिली होती. दि. 21/ 09/ 2021 ते दि. 2/ 5/ 2022 रोजीचे दरम्यान मॅप्रो. फुड्स प्रा. लिं. शेंदुरजणे या कंपनीच्या आवाराचे बाजुला कंपनीच्या जागेत असलेल्या गोडावूनचे पत्रा शेडमधुन 41 लाख 80 हजार 200 रु. किंमतीच्या जेली प्रोडक्ट तयार करण्याच्या अॅल्युमिनिअम व कास्टिंगपासुन तयार झालेल्या 9 हजार 857 डाय व 35 लहान मोठ्या मोटारी चोरीस गेलेल्या आहेत. त्यानुसार वाई पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करणेत होता. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्ह्याचा तपास स्वत: कडे घेतला.

त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचाऱ्यांना आरोपीचा शोध घेणेबाबत व गुन्ह्याचे तपासाबाबत सुचना देवुन तपास कामी रवाना केले होते. गुन्ह्याचा तपास चालु असतांना पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली. सदरची चोरी वाई शहरातील दोन इसमांनी केलेली आहे. त्यांनंतर सदर आरोपींचा शोध पुणे, शिरवळ, वाई येथे घेण्यात आला. दरम्यानच्या कालावधीत सदर आरोपी वाई शहरात आल्याची बातमी मिळाल्याने बाळासाहेब भरणे व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेवून दि. 13 मे रोजी अटक केली. सदर आरोपींकडे गुन्ह्याचे अनुशंगाने तपास करीत असताना त्यांनी सदरची चोरी केली असल्याचे मान्य करुन चोरीचा माल कोठे विकला आहे याची माहिती सांगितली. त्यानंतर त्यांनी विकलेला माल हा वितळवुन त्यापासुन अॅल्युमिनिअमच्या विटा तयार केलेल्या असल्याने त्याचेकडुन 1 हजार 260 किलो वजनाच्या अॅल्युमिनिअमच्या विटा किंमत रुपये 34 लाख 65 हजार रूपयांच्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

सदर गुन्ह्याचा सखोल तपास चालु असुन यामध्ये आणखी आरोपींचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. सदरची कारवाई अजयकुमार बंन्सल पोलीस अधिक्षक सातारा, अजित बो-हाडे अपर पोलीस अधिक्षक सातारा, श्रीमती शितल जानवे / खराडे उप विभागीय पोलीस अधिकारी वाई, यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन गुन्हे
प्रकटीकरण विभागाचे पोलीस कर्मचारी विजय शिर्के सहा. पोलीस उपनिरीक्षक, सोनाली माने महिला पोलीस नाईक, पोलीस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर, श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर अमित गोळे, चालक सागर धुमाळ यांनी सहभाग घेतला होता.

Leave a Comment