Monday, January 30, 2023

उद्या मराठा क्रांती मोर्चाला मिळणार नवीन दिशा; छ.संभाजीराजे मराठवाडा दौऱ्यावर

- Advertisement -

औरंगाबाद | छत्रपती संभाजी महाराज मराठवाड्याच्या दौर्‍यावर येणार असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि जिल्ह्यातील समन्वयक व समाजबांधवांची वेरुळ येथे बैठक होणार असून मराठा क्रांती मोर्चाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रमेश केरे पाटील म्हणाले, – छत्रपती संभाजी राजे हे उद्या शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे दुपारी तीन वाजता युवक व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. तसेच वेरूळ येथील छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या गडीचे विकास कामाबद्दल पुरातत्त्व खात्याकडे पाठपुरावा करणार असल्याची देखील माहिती यावेळी त्यांनी दिली. त्यानंतर मराठा समन्वय व मराठा समाज बांधवांना सोबत पुढील आंदोलनासंदर्भात चर्चा करून बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर चार जुलै रोजी ते परत जातील असेही ते म्हणाले.

- Advertisement -

या पत्रकार परिषदेला अप्पासाहेब कुडेकर, किशोर चव्हाण, राजेंद्र पवार, राहुल पाटील, उद्धव काळे, किरण काळे पाटील, अशोक वाघ, पंढरीनाथ गोडसे, भरत कदम, परमेश्वर नलावडे, मनोज मुदाडे, शुभम केरे आप्पासाहेब जाधव यांची उपस्थिती होती.